Ad will apear here
Next
‘गोगटे-जोगळेकर’ला पावणेदोन लाखांची पारितोषिके
‘रंगवैखरी’च्या महाअंतिम फेरीत सांघिकसह वैयक्तिक बक्षिसांची लयलूट


रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित रंगवैखरी या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची महाअंतिम फेरी सहा जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडली. महाराष्ट्र आणि बेळगाव केंद्रातून विभागीय अंतिम फेरीत निवडून आलेल्या सात संघांचे नाट्याविष्कार या वेळी झाले. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाने बसवलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांवर आधारित ‘अधिक देखणे तरी’ या एकांकिकेने सांघिक द्वितीय पारितोषिक पटकावून पाच वैयक्तिक बक्षिसे मिळवली. सव्वा लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन संघाला गौरविण्यात आले.

या स्पर्धेला नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नंदेश उमप, शर्वरी जमेनीस, परेश मोकाशी, रेखा इनामदार-साने, शशांक शेंडे हे परीक्षक म्हणून लाभले. यंदाच्या ‘रंगवैखरी’साठी ‘नव्या वाटा’ हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालाच्या विनायक पांचाळ व श्वेत भागवत यांना सर्वोत्कृष्ट शिल्पकलेसाठी १५ हजार रुपये आणि मानचिन्ह असे प्रथम पारितोषिक मिळाले. हृषीकेश वैद्य आणि श्रेया जोशी या दोघांनाही सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी (पुरुष आणि स्त्री) दहा हजार रुपयांचे द्वितीय आणि मानचिन्ह, निरंजन सागवेकर याला सर्वोत्कृष्ट चित्रासाठी द्वितीय दहा हजार रुपये आणि मानचिन्ह, आणि प्रसन्न खानविलकर याला सर्वोत्कृष्ट लेखकासाठी दहा हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक आणि मानचिन्ह देऊन मान्यवरांनी सत्कार केला. या एकांकिकेसाठी मराठी वाङ्मय मंडळाच्या डॉ. निधी पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरावड्यानिमित्त या एकांकिकेचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, संस्थेचे पदाधिकारी डॉ. कल्पना मेहता, अॅड. प्राची जोशी, उदय लोध, राजन मलुष्टे, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, मराठी वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे यांच्यासह प्राध्यापक, महाविद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांनी विजेत्या संघाचे कौतुक केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZTLBW
Similar Posts
‘गोगटे-जोगळेकर’च्या मराठी वाङ्मय मंडळाचे यश रत्नागिरी : राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या वतीने साडवली (देवरुख) येथे जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळाच्या पाच विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली.
विद्यार्थ्यांनी लिहिले भारतमातेला पत्र रत्नागिरी : रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतमातेला अनोखी ‘पत्ररूपी’ भेट दिली. व्हॉट्सअॅपच्या युगात पत्र लिहिण्याचा विसर पडला असल्याने मराठी विभागाने विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन पोस्ट कार्डावर पत्र लिहिण्यास प्रवृत्त केले.
डॉ. पटवर्धन मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी गाइड रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत असलेल्या डॉ. निधी पटवर्धन यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी गाइड म्हणून मान्यता मिळाली.
‘संस्कृत ही वैज्ञानिक भाषा’ रत्नागिरी : ‘संस्कृत ही ठराविक समाजाची भाषा नाही. संस्कृत ही वैज्ञानिक भाषा असून, अनेक विषयांवर वैविध्यपूर्ण साहित्य आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या संस्कृत केंद्राद्वारे अनेक जण संस्कृत शिकत आहेत. लोकांना याचा फायदा होत आहे,’ असे प्रतिपादन या केंद्राचे शिक्षक हिरालाल शर्मा यांनी केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language